करमाळा -प्रतिनीधी- दि.१७ भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. जयंतीनिमित्त जि.प्र.प्रा.शाळा आवाटी येथे विविध स्पर्धचे आयोजन कै. जनाबाई खताळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आला होते.या प्रसंगी अनेक विद्यार्थींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय, तृतीया आणि उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे पुस्तक देऊन वाचनालयाच्या वतीने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत खताळ यांनी जि.प्र.प्रा.शाळा आवाटी येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आवाटी शाळेचे मुख्याध्यापक मधूकर आंधारे हे होते. यावेळी निबंध स्पर्धेत मोठा गट म्हणून श्रावणी शिंदे प्रथम, नंदकुमार शिंदे , द्वितीय, साक्षी चौधरी तृतीय, श्रेया शिंदे व अंकिता चौधरी उत्तेजनार्थ, लहान गटांमध्ये अंजली शिंदे प्रथम, अनुष्का चोपडे द्वितीय,राजश्री हराळे व नंदनी ननवरे तृतीया, वकृत्व स्पर्धेमध्ये अनुष्का चोपडे प्रथम, श्रावणी शिंदे द्वितीय, रांगोळी स्पर्धेमध्ये राजश्री हराळे व अनुष्का चोपडे प्रथम सई चिरके व प्राजक्ता शिंदे द्वितीय, अंकिता चोपडे व नंदनी शिंदे तृतीया, इत्यादी यशस्वी विद्यार्थींचा वाचनालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबाना मुलाणी यांनी केले. तर आभार वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत खताळ सर यांनी मानले.
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक मधूकर अंधारे, जयराम सांगळे, अजित कणसे,आवाटी गावचे सरपंच तबसुम साब्बीर खान,के.एन.शिंदे, धर्मा शिंदे, नाना गायकवाड, दीपक गायकवाड, सतीश बंडगर,जगन्नाथ हराळे, तलाठी नाना खताळ, काशिनाथ शिंदे, रामचंद्र शिंदे,केरबा गायकवाड,विष्णु शिंदे,रोहित गायकवाड,बालाजी चौधरी,सचिन सुळ, भास्कर तरटे इत्यादी सह विद्यार्थ्यी,पालक, मान्यवरांची उपस्थिती होती. कै.जनाबाई ए.खताळ वाचनालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे पुस्तके सर्वांना बक्षीस म्हणून देण्यात आले. कार्यक्रम समारोप नंतर उपस्थितीत मान्यवर,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आवाटी येथे कै.जनाबाई एकनाथ खताळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली

Share this post :
Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Latest News
अवकाळी पावसाने डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव… उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात…
June 24, 2025
No Comments
अन्यायाविरोधात लढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करण्याच स्वप्न पुर्ण
June 23, 2025
No Comments
मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन
May 31, 2025
No Comments
Categories
Subscribe our newsletter
Purus ut praesent facilisi dictumst sollicitudin cubilia ridiculus.