अन्यायाविरोधात लढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करण्याच स्वप्न पुर्ण

अर्चना शिवाजी डावरे कोनांबे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या खेडेगावात यांचा जन्म झाला वडील शेतकरी होते तसेच पदवीधर असल्यामुळे घरातूनच त्यांना शिक्षणाचा वारसा लाभला परंतु अर्चना डावरे यांना आणखी पाच भावंड असल्यामुळे भावंड असल्यामुळे या सर्वांचे शिक्षण करताना वडिलांची चांगलीच दमछाक होत होती तरीही त्यांनी मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ दिला नाही. अशा खडतर परिस्थितीमध्ये अर्चना डावरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण कोनांबे व बीएससी पर्यंत शिक्षण जी एम डी कॉलेज सिन्नर येथे अतिशय चांगल्या गुणांनी पूर्ण केले. त्यानंतर एमसीएम हे शिक्षण नाशिक येथील केटीएचएम कॉलेज येथे पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली त्यानंतर त्यांच्या पतींचा मृत्यू झाला लहानपणापासून अतिशय खडतर आणि अडचणींमधून जीवन जगल्यामुळे त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी होती. तसेच पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर खूप अन्याय झाला , त त्यांच्या मृत्युनंतर त्यांना खूप लोकांचा त्रास सहन करावा लागला , जिवन जगण्यासाठी अतिशय संघर्ष करावा लागला , पतीच्या मृत्युनंतर त्यांच्याकडे दोन मुले हिच त्यांची संपत्ती होती , त्या या सगळ्यातून सावरत मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, आपल्या मुलांना त्यांनी चांगले संस्कार व शिक्षण दिले.

कोणाकडे हात न पसरवता पुण्यात त्यांनी स्वतःचे क्लासेस चालू केले होते,त्या उत्पन्नातून मुलांना चांगली शिक्षण द्यायचे ठरवले अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जो अन्याय किंवा त्रास सहन करावा लागला तो इतरांना सहन करावा लागू नये म्हणून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी विधी म्हणजेच वकिलीचे शिक्षण घेऊन उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली करण्याचा निर्णय घेतला. मुलांचे संगोपन, शिक्षण , पतीच्या निधना नंतर त्यांचे आजारपण व घराचा खर्च यासाठी बाहेरील मुलांचे क्लासेस सर्वांतून वेळ काढून त्यांनी वकिलीचे शिक्षण पुणे येथे अतिशय चांगल्या गुणांनी पूर्ण केले. त्यांनी घेतलेल MCM चे शिक्षण व आजु बाजुला वाढलेले cyber crime यामधुन त्यांनी cyber law मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,अशा निर्भीड , खंबिर व्यक्तिमत्व असलेल्या विधी तज्ञ अर्चनाताई डावरे ‌‌,(वाबळे) यांना उच्च न्यायालय मुंबई येथे काम करण्या साठी हार्दिक शुभेच्छा.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *