सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरे
करमाळा तालुक्यातील हिसरे येथील नूतन ग्रामपंचायत सदस्य तसेच वडार समाज संघटना उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा श्री.विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिसरे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार (दि.२४) रोजी करण्यात आले होते.
शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तरुणांसह मध्यम वयोगटातील मंडळींनी सहभाग घेऊन रक्तदान केले. सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ४३ जणांनी रक्तदान करून बांधिलकी जपली.
विकास ननवरे मित्र परिवार यांच्या सहकार्याने हिसरे येथील ग्रामपंचायत भवनमधील सभागृहात गुरुवारी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन जेऊरचे सरपंच पै.पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्त संकलन मेडिकेयर ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या सौजन्याने करण्यात आले.
धावपळीच्या जीवनात अपघात व इतर आजारपणावर उपचार करताना रक्ताची गरज निर्माण होते. रुग्णालयात त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी विकास ननवरे मित्रपरिवाराने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करण्याचा उपक्रम हाती घेतला. सकाळपासून दुपारपर्यंत सुरु असलेल्या या शिबिरात एकूण ७२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. श्री.विकास ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला सुरुवातीपासूनच रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला.
गावातील अनेक तरुणांसह मित्रमंडळातील पदाधिकारी, सदस्य तसेच मध्यम वयोगटातील मंडळींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. हा उपक्रम सफल करण्यासाठी बाळासाहेब पवार, अनिल जगदाळे,अतुल रंदील, बाळासाहेब कोंडलकर, दत्ता टकले, तायाप्पा सातपुते, विशाल ठोंबरे, अंबादास विटकर, सोमा ओहोळ ,मारुती तेलंगे,शरद विटकर,आदींनी श्रम घेतले. रक्तदान करणार्या व्यक्तींना श्री. विकास ननवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.