करमाळा प्रतिनिधी –
31 मे धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, सर्व शासकीय कार्यालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे.
धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती संपूर्ण भारत देशामध्ये उत्साहामध्ये साजरी करण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदर्श महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे असा शासनाचा जीआर आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारत देशातील सर्व मंदिरांचा जुर्णोद्धार केला, घाट बांधले, विहिरी खोदल्या जे राज्यामध्ये दरोडेखोर होते त्यांना शासन करून जमिनी करण्यासाठी दिल्या.
कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श असा 30 वर्ष राज्य कारभार चालवला स्वतःच्या मुलाला सुद्धा शिक्षा ठोठावली होती. अशा उत्तम प्रशासक होत्या. छत्रपती शिवाजी महाराजा नंतर उत्कृष्ट असा राज्यकारभार त्यांनी केला, त्यांनी आपल्या देशांमधील बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला त्या उत्कृष्ट अशा प्रशासक होत्या व शिवभक्त ही होत्या, अशा या धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.