चिंचवडमधील केशवनगर, काकडे पार्कच्या पाठीमागे सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात एक श्वान अडकले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सदर श्वान गेल्या दोन दिवसांपासून खड्ड्यात अडकून पडले होते. खड्डा खोल आणि अरुंद असल्यामुळे श्वान स्वतःहून बाहेर पडू शकले नव्हते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून त्यांनी श्वानाला वाचवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मदतकार्य सुरू केले. रोपच्या सहाय्याने बो-लाइन नॉट (Bowline Knot) बांधून, संपूर्ण काळजी घेत श्वानाला सुखरूपपणे वर ओढण्यात आले. संपूर्ण बचावकार्य अत्यंत दक्षतेने आणि धैर्याने पार पाडण्यात आले. श्वानाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशामक पथक यशस्वी ठरले. परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागाच्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक केले.
या बचाव मोहिमेत पुढील अग्निशामक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते:
- श्री. संपत गौंड (लीड फायटर)
- श्री. अनिल माने (सीनियर फायटर)
- श्री. संभाजी सूर्यवंशी (वाहन चालक)
- श्री. सौरव इंगवले (टीएसओ)
- श्री. राहुल जाधव (फायर फायटर)
- श्री. सचिन दोडे (फायर फायटर)
- श्री. मयूर सुक्रे (फायर फायटर)
- श्री. सुरज माने (फायर फायटर)
सदर बचावकार्य हे अग्निशामक दलाच्या समर्पित सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरले.