स्व डाँ प्रदिप कुमार जाधव पाटील यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप

करमाळा प्रतिनिधी –

स्वातंत्र दिनी डॉ प्रदीप कुमार बुवासाहेब जाधव पाटील यांच्या स्मरणार्थ तरटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य आई कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष रोहन जाधव पाटील व सचिव तथा उपसरपंच अभिजीत जाधव पाटील यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजिंक्य जाधव पाटील यांच्या हस्ते स्कूल युनिफॉर्म , ट्रक सुट, स्कूल बँग हे शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते यावेळी सरपंच रजनी जगदाळे ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य धनराज मोरे , श्रीनाथ घाडगे,अनुजा जाधव, ज्योती हरिदास मोरे,माजी सैनिक बबन नलवडे, शिवाजी जाधव, जयराम जाधव, शालेय समिती अध्यक्ष शरद नलवडे,खरगे गुरूजी, नलवडे गुरूजी ग्रामसेवक साबळे मँडम व तरटगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *