राष्ट्रीय समाज पक्ष श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आले असून, श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नियोजन बैठक शनिवारी ५ जुलै रोजी श्रीरामपूर शहरातील टिळक वाचनालय येथे सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असून या बैठकीला जिल्ह्यातील जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब जुंधारे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनर, वारकरी व कलावंत आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ येळे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश राशनकर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्ना शेख, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख इनायत अत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक तालुकाध्यक्ष अण्णासाहेब मुजाळ व महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.वंदना आढाव यांनी दिली. तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवहान करत असताना काही निवडी या प्रसंगाने तालुका बांधणीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.