न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या.

सोलापुर प्रतिनिधी: नवनाथ चव्हाण

सोलापुरातील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी दोन गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोलापूरमध्ये मेंदू रोग रुग्णांसाठी मोठं रुग्णालय सुरू करणारे डॉ शिरीष वळसंगकर – डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील पहिले न्यूरॉलॉजिस्ट होते.


डॉ. वळसंगकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं. सोलापूरमध्ये न्यूरॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. शिरीष वळसंगकर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
अनेक जणांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरने स्वत:चं च आयुष्य संपवल
सोलापूर शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंगकर रुग्णालयाने अनेक मेंदूरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे. त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत ची माहिती अद्याप समोर आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती कारणांमुळे डॉ शिरीष वळसंगकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती. त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट – डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अनेक महिन्यांपासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वत:च्या डोक्यात झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब डॉ. शिरीष वळसंगकर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना डॉ. शिरीष वळसंगकर यांची प्राणज्योत मालवली. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *