एम आय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या अंतर्गत MI लाइफस्टाइल आयुर्वेदिक ज्ञानेश्वरी होम शॉपी कोर्टी येथे उद्घाटन सोहळा संपन्न

Korti

नवनाथ चव्हाण – पश्चिम महारष्ट्र उपसंपादक

प्रो.प्रा. सौ. सारिका अतुल मेढे मॅडम यांनी आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरणे काळाची गरज असणार आहे याची दूरदृष्टी ठेवून शेतीसाठी व लोकांच्या दैनंदिन उपयोगासाठी व आरोग्यासाठी एक समाज कार्याची आवड व भावना मजपत आयुर्वेदिक शॉपी चा उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आणि उद्घाटन सोहळ्यास उपस्थित कंपनीचे CTC लीडर श्री. दादासाहेब वाघज सर, कोर्टी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री. मेहर साहेब ,कंपनीचे TC लीडर श्री. युवराज भोरे सर तसेच श्री.बबन इंगवले सर , आणि बहुजन मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षा प्रमिला जाधव मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
CTC ग्रेट लीडर श्री.दादासाहेब वागज सरांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट बद्दल खूप छान अशी माहिती दिली आणि का आणि कसे वापरावेत खूप छान असे मार्गदर्शन केले, सध्याचा शेतीचा खराब होत असलेला कस बघून विषमुक्त शेती कशी करावी हेही चांगल्या भाषेत समजावून सांगितले.


आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे तेही त्यांनी सांगितले. आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरून माणसाच्या आयुर्मान कसे वाढते ते सांगितले. त्यानंतर गावातील तरुण मुलांनी आयुर्वेदिक प्रोडक्ट ची व्हॅल्यू जाणून घेतली व यापुढे आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरू असे आश्वासन दिले तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा कोर्टी येथील कर्मचारी साळुंके मॅडम व खंडागळे मॅडम (आशीर्वाद हॉटेलचे मालक ) विकास शिरसकर, श्रीकांत साखरे महाराज . नानासाहेब झाकणे, श्रीमंत झाकणे , शिवाजी झाकणे नवनाथ माने सर सचिन गावडे सुरेश टेके निवेदक सचिन नवले त्रिंबक झाकणे दत्तात्रेय मेढे आणि शकील शेख हे सर्व गावातील नागरिकांनी शॉपी उद्घाटनास प्रोत्साहन देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान करून आयुर्वेदिक प्रोडक्टची माहिती ऐकली समजून घेतली व आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरू आणि आरोग्याची काळजी घेऊ आम्ही असे आश्वासन दिले.

शॉपीचे प्रोप्रायटर श्री. अतुल मेढे सर व सौ सारिका अतुल मेढे मॅडम यांनी सर्व उपस्थित नागरिकांचे तसेच मान्यवरांचे आभार मानले.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *