करमाळा प्रतिनिधी :
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
१७ वर्षे वयोगट मुलींमध्ये श्रेया अशोक सरडे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, तिची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच १४ वर्षे वयोगट मुलांमध्ये सुयोग हरी शिरसागर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तर शिवरत्न आदलिंग याने तृतीय क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांचीही विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षे वयोगट मुलींमध्ये वैष्णवी युवराज जाधव हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तिची देखील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामुळे कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ए बी एन एक्सप्रेस न्यूज परिवाराकडूनही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विभागीय स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!