करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथील सीना नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करावे अशी मागणी भाजप किसान मोर्चा सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. लवकरात लवकर जर दारे बंद नाही केले तर उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासू शकते.
सीना नदी वरती खडकी, तरडगाव, पोटेगाव, संगोबा असे करमाळा तालुक्यातील चार बंधारे आहेत सीना नदीतील पाणी कमी झाल्यामुळे आता दरवाजे टाकने गरजेचे आहे. १५ ऑक्टोबरला दरवाजे टाकण्याचा नियम आहे परंतु एक महिना लोटला तरी दरवाजे टाकले नाही हा अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणा आहे.
कारण संगोबा परिसरात खांबेवाडी, निलज, बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी अशा अनेक गावची पाणी पुरवठ्याची सोय सीना नदीवरूनच आहे. त्याच प्रमाने जनावरांची पाणी पिण्याची सोय देखील या नदी द्वारेच आहे. जर दरवाजे त्वरित बंद नाही केले तर पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थितीत होऊ शकतो म्हणून प्रशासनाणे याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी.
जर आठ दिवसांमध्ये संगोबा बांधायचे दारे न टाकल्यास संगोबा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती भाजप जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी दिली आहे.



