पांडे प्रतिनिधी –
पांडे ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या व स्मशानभूमी कामासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे पांडे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
पांडे येथील
1) जुना पांडे – गुळसडी रस्ता (खंडोबा मंदिर, दयाप्पा भोसले वस्ती मार्गे)
२)कोल्हे वस्ती रस्ता.
३)पांडे – संगोबा (पांडवड्यावरील पुल व विटकर गल्ली ते विजय कुंभार वस्ती) रस्ता.
४)सार्वजनिक स्मशानभूमी
अशा अनेक कामांची ची दखल लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावी.
अन्यथा पांडे ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली असून, प्रशासनाने वेळेत पावले न उचलल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असणार आहे. असे मत सौ दुधे यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामस्थांच्या वतीने सौ.अश्विनी शिवराज दुधे यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



