लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ॲड. खंडागळे यांना ‘विधिरत्न पुरस्कार

दौंड | प्रतिनिधी. नवनाथ चव्हाण
पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अण्णा भाऊ साठे प्रेरणा महोत्सव-२०२६’ अंतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सामाजिक व कायदेविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सीनियर लॉयर ॲडव्होकेट खंडागळे साहेब यांना प्रतिष्ठित ‘विधिरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

दौंड येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कु. दुर्गादेवी जगदाळे यांच्या हस्ते ॲड. खंडागळे साहेबांनी पुरस्कार स्वीकारला.

कायदा क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द, न्यायासाठीची भूमिका, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“आपले यश… आमचा अभिमान! आपल्या कार्याला मनःपूर्वक सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *