पिरंगुट :
पुणे येथील भारती विद्यापीठ
अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राज्य शासनाचा ऊर्जा विभाग यांच्या वतीने लवळे (ता. मुळशी) येथील भारती विद्यापीठ संकुलात वृक्षारोपण अभियान राबविले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाचे विद्युत निरीक्षक शिवराज दुधे, शाखा अभियंता अनिता कांबळे व जीवन पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी प्रमुख पाहुण्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व पुढील वर्षात देखील ऊर्जा विभाग व महाविद्यालयाच्या सहकार्यान वृक्षारोपण कार्यक्रम करण्याची ग्वाही दिली. सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. उदय पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि उद्यान विभागाच्या कर्मचारी यांनी सहकार्य केले.