सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरे
काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी हिसरे ता.करमाळा येथील तरुण युवक श्री. दत्ता पोपट राऊत यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात गेली 2 महिने उपचार सुरू होते, पण काल अचानक त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांचे सकाळी दुःखद निधन झाले.
ते मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड हे खाण मंत्रालय, भारत सरकार या ठिकाणी नोकरीस होते. चांगल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गावात ख्याती होती. गावात प्रत्येकाच्या मनातून भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, विवाहित 4 बहिणी असा परिवार आहे.



