करमाळा प्रतिनिधी:
मौजे बाळेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील महाराज गोरखनाथ ज्ञानदेव नलवडे यांचे दिनांक 21/01/2026 या दिवशी रात्री 1:20 वा. प्राणज्योत मालवली. ज्यांनी आयुष्यातील पन्नास वर्ष अध्यात्मिक क्षेत्रात घालवली, आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून दिला, एवढेच नाही तर यांच्या अभ्यासू वृत्ती आणि आवडीमुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत अध्यात्मिकतेची आवड निर्माण होऊन त्याचे रूपांतर सप्ताहामध्ये झाले. आज पर्यंत वर्षानुवर्षे ते सप्ताह, भजन, कीर्तन यामध्ये मग्न होऊन गेले.
अध्यात्मात येण्यापूर्वी त्यांनी गाव गाड्यांमध्ये सहभाग घेऊन सलग दोन पंचवार्षिक सरपंच पद भूषवले होते. आज त्यांच्या मागे पत्नी, पाच मुली, एक मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. इतर त्यांचे तीन लहान भाऊ तीन बहिणी अशा प्रकारची सर्व कुटुंब संख्या साधारण 60 ते 70 जाणाचं असेल, त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अध्यात्मिक असल्याकारणाने त्यांचे गोड बोलणे, सर्वांशी प्रेमाने राहणे, कधीही कोणावर राग राग न करणारे, असेल त्या परिस्थितीला हसतमुख सामोरे जाऊन इतरांसाठी प्रेरणादायक, मोठेपणा, प्रसिद्धीपासून लांबच राहणारे असे संत प्रवृत्तीचे महाराज गोरखनाथ नलवडे अनंतात विलीन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.



