भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघ ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती

हडपसर प्रतिनिधी:

भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघाच्या ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर पूर्वचे भाजप अध्यक्ष समीर घुले यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.


सुहास भंडारी हे सहकारी बँकिंग क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पुणे शहरातील सुप्रसिद्ध निवेदक म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या उत्तम जनसंपर्कामुळे आणि संघटन कौशल्यामुळे त्यांना समाजात विशेष मान्यता मिळाली आहे. उत्कृष्ट निवेदक, संघटक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.


नियुक्तीप्रसंगी बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, “सुहास भंडारी हे समाजातील सर्व स्तरांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षाला हडपसर विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक विस्तार, पक्षबांधणी आणि ओबीसी समाजातील जनसंपर्क वाढविण्यासाठी निश्चितच लाभ होईल.” तसेच त्यांनी भंडारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक प्रशांतमामा तुपे, नगरसेवक डॉ. दादा कोद्रे, नगरसेवक खंडू लोंढे, नगरसेवक किशोर धायरकर, नगरसेविका पायलताई तुपे, नंदाताई आबनावे, सारिकाताई घुले तसेच पदाधिकारी संदीपभाऊ दळवी, समीर घुले, शिवराजआप्पा घुले, संदीप नाना तुपे, भूषणदादा तुपे, माऊली कुडले, गणेश घुले, प्रांजली धायरकर, सविता हिंगणे, सीमा शेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुहास भंडारी यांच्या नियुक्तीमुळे हडपसर परिसरातील ओबीसी समाजामध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *