पांडे:
खांबेवाडी गावचे तरुण तडफदार नेतृत्व श्री रामभाऊ शिंदे यांनी पांडे ग्रुप ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. पांडे ग्रामपंचायत विकासापासून वंचित राहिलेले आहे.
खांबेवाडी गावातील अंतर्गत रस्ते, पथदिवे, तसेच सांडपाण्याची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर खांबेवाडी येथील अठरा विश्व दारिद्र्य मध्ये अडकलेली स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेली काटेरी झाडे तेथे नसलेली लाईटची सोय यामुळे गावातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याचा विधी करण्यास खूप अडचणी येत असतात. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
वरील सर्वच गोष्टींचा आपण पाठपुरावा करणार असून खांबेवाडी गावठाणा मध्ये महालक्ष्मी मंदिराच्या कामासाठी देखील प्रयत्न करणार आहोत, तसेच खांबेवाडी ते पांडे रस्त्यासाठी आमदार नारायण पाटील यांच्याकडे निधीची मागणी करण्यात येईल तसेच खांबेवाडी येथे पाणी फिल्टरची तरतूद करण्यात येईल.
वरील सर्वच कामाचा आपण पाठपुरावा करणार असून पांडे ग्रुप ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आव्हान देखील त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.



