करमाळा प्रतिनिधी :
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कात्रज येथे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय आणि दिमाखदार वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली असून, त्यांच्या कलागुणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती राणी झुंजरुक (जंगले) यांनी प्रेरणादायी प्रस्तावना मांडत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते, लावणी, समूहगीत अशा विविध कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण केले. या सादरीकरणांनी उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांचे डोळे भरून आले.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. नितीन कदम, कोर्टी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मिनीनाथ टकले, श्री. जयवंत नलवडे तसेच जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महावीर गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जि. प. शाळा कोंढार चिंचोली येथील सहशिक्षिका श्रीमती बारवकर मॅडम व खातगाव नं. १ चे मुख्याध्यापक श्री. बोडखे सर यांनीही तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. श्रीधर लकडे, उपाध्यक्ष श्री. हरीभाऊ माने व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच जिंती केंद्रातील श्री. नवले सर, श्रीमती गिरंजे मॅडम, श्री. भोंग सर, श्री. देवकते सर, श्री. पाटील सर, श्रीमती गर्जे मॅडम व श्री. सानप सर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
या सोहळ्यास जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महावीर गोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच केतुर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विकास काळे व हिंगणी शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवकर सर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तात्यासाहेब धायगुडे यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन सुबोध हिवराळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्रथमेश गोरे, सुबोध शिवराळे, अविनाश नेवसे आणि राणी झुंजरुक यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनामुळे कात्रज परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेच्या या प्रगतीशील उपक्रमाचे संपूर्ण करमाळा तालुक्यात कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



