मिळकत कर भरूनही संगणक प्रणालीत नोंद नाही; भ्रष्टाचाराच्या शक्यतेवर भाजप गटनेत्यांची चौकशीची मागणी

पुणे प्रतिनिधी :

फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सध्या दुबार कर भरण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी पुणे महानगरपालिका (मनपा) कडे मिळकत कर भरलेला असतानाही, नगरपरिषदेकडून तोच कर पुन्हा भरण्याची मागणी केली जात आहे.
सदर प्रकरणात संगणक प्रणालीतील त्रुटीमुळे भरलेला कर दाखवला जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा कर भरावा लागत असून आर्थिक भुर्दंडासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता व्यक्त करत भाजप गटनेत्या नगरसेविका अमृता धनंजय कामठे यांनी तातडीने चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी प्रसादजी शिंगटे यांच्याकडे निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाचे शासकीय ऑडिट करण्याची मागणी केली.
तसेच टॅक्स विभाग, संगणक विभाग, कॅश विभाग आणि संबंधित ठेकेदार एजन्सी यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सध्याच्या ठेकेदार एजन्सीचे काम तात्काळ थांबवून नव्याने एजन्सी नेमावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष संतोष भाऊ सरोदे, उपनगराध्यक्ष ओंकार कामठे, भाजप नेते धनंजय आप्पा कामठे, सागर शेठ खुटवड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये या प्रकारामुळे संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *