महाराष्ट्र राज्य वधु वर सूचक संघटना मध्ये सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राजाराम सरक पाटील यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य वधु वर सूचक संघटना यांच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. राजाराम उर्फ आबा काशिनाथ सरक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी सत्कार करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आबा सरक पाटील यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे ‘कर्मयोगी वधु वर सूचक संस्था’ची स्थापना करून गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने कार्य सुरू ठेवले आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक वधू-वर सूचक मेळावे आयोजित करून शेकडो विवाह जुळविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
आबा सरक पाटील यांना कर्मयोगी स्वर्गीय गोविंद बापू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत वधू-वर सूचक मेळावे घेतले. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजहिताच्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य वधु वर सूचक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. या निवडीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
आबा सरक पाटील यांच्या या निवडीमुळे वधु-वर सूचक चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *