दौंड शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर — 230 नागरिकांनी घेतला लाभ

नवनाथ चव्हाण – पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक

दौंड (जि. पुणे) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात जनसेवक युवा नेते रुपेशभाऊ बंड आणि लहुजी सेना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, ज्याचा लाभ तब्बल 230 गरजवंत नागरिकांनी घेतला.

या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रेमसुख शेठ कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी दौंडचे आमदार राहुलदादा कुल, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, माजी पंचायत समिती सभापती आप्पासो पवार, डॉ. समीर कुलकर्णी यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना अर्पण केली व नागरिकांशी संवाद साधला.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात विशाल कोयलकर, आकाश पळसे, पप्पू आरके, आदित्य भोसले, सुरज सकट, बाबू मोघे आणि कुणाल बंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रुपेशभाऊ बंड यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेला हा आरोग्य उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाजप्रेरित विचारांना आणि कार्याला खरी श्रद्धांजली ठरली.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *