करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल करमाळा कृषी अधिकारी श्री देवराव चव्हाण यांचा सन्मान भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री अण्णासाहेब सुपनवर यांनी केला. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या कृषी अधिकारी यांच्यामार्फत सोडवल्या जात आहेत, खरीप हंगामामध्ये बी – बियाणे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर अधिकारी उपस्थित होते, माती परीक्षण सेंद्रिय शेतीचे महत्व समजून शेतकऱ्यांना मार्गदर्शन ही त्यांच्याकडून केले जात आहे.

करमाळा तालुका हा केळी उत्पन्नामध्ये सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर असून कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना सहकार्य केल्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये केळीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कृषी अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांच्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कृषी अधिकारी चव्हाण यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अळी अडचणी आमच्यासमोर मांडाव्यात आम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास व अडचणी सोडवण्यास सदैव तत्पर असणार आहोत