कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसेची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड - Maharashtra Latest News | ABN Express News

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसेची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सरकोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ७१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक
सरकोली (पंढरपूर) येथे दि. २६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील विद्यार्थी वैभव सुरवसे याने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षे वयोगटातील ७१ किलो वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या जोरावर वैभवची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वैभवने स्पर्धेत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या यशामुळे कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वैभवच्या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वैभवच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव सर, तसेच श्री. अंकुश खाने सर, श्री. भागवत सर आणि श्री. जगदाळे सर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैभवला पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, वैभवला कुस्तीचे मार्गदर्शन करणारे श्री. जितेश कांबळे सर आणि श्री. शुभम पाटील सर यांचाही श्री. शरद शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैभवच्या यशामागे त्याचे सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि मार्गदर्शकांचे योग्य प्रशिक्षण यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हास्तरावर मिळवलेल्या यशानंतर आता वैभव विभागीय कुस्ती स्पर्धेत आपल्या विद्यालयाचे आणि जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या पुढील स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *