मांजरी खुर्द.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हवेली प्रतिनिधी :

मांजरी खुर्द. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “एक गाव एक भीम जयंती” या संकल्पनेतून हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भीमगीतांच्या माध्यमातून वंदना करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता भिक्षू संघाच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशील वंदना पार पडणार आहे.
तसेच दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात स्थानिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गस्थ होऊन गावातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून, समाजात एकता व बंधुता वाढविण्याचा संदेश दिला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, मांजरी खुर्द. यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *