तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे रामकृष्ण हरी बिजमंत्र जपाला दोन वर्ष पूर्ण - Maharashtra Latest News | ABN Express News

तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे रामकृष्ण हरी बिजमंत्र जपाला दोन वर्ष पूर्ण

श्री शेत्र संगोबा –

तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे रामकृष्ण हरी बिजमंत्र जपाला दोन वर्ष पूर्ण झाले.
यानिमित्त संगोबा येथे दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानादिवशी तथा सोमवती अमावस्या दिवशी सोमवार दिनांक 20/10/2025 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वासकर वारकरी संप्रदायाचे श्रीगुरु ह.भ.प. देवव्रत तथा राणोजी वासकर महाराज स्वतःच उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांची प्रवचन सेवा होणार आहे.
यानिमित्त सर्व उपस्थितांच्या वतीने सोमवारी सायंकाळी 4:00 ते 5:30 यावेळात सामूहिक रामकृष्ण हरी जप, त्यानंतर सायंंकाळी 6:00 ते 7:00 प्रवचन सेवा आणि संध्याकाळी 7:00 ते 9:00 पर्यंत वासकर फडातील ह.भ.प. आनंद महाराज जाधव भालेवाडी यांचे सुश्राव्य किर्तन सेवा होणार आहे.
कीर्तन सेवा संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे अतीशय छान नियोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्त, श्री अदिनाथ महाराजाचे भाविक भक्त व पंचक्रोशीतील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज अन्नछत्र मंडळ संगोबा पंचक्रोशी चे मुख्य प्रवर्तक मा.ॲड. प्रा. शशिकांत नरुटे सर तसेच नियोजक तथा पाईक वारकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष वासकर फडातील ह.भ.प. संजय (बप्पा) गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *