करमाळा दिनांक [ प्रतिनिधी ] : करमाळा तालुक्यातील एका पूरग्रस्त महिलेला रात्रीच्या सुमारास प्रसूतीसाठी उपचाराची गरज निर्माण झाली होती. ही महिला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आली, मात्र तेथे भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तिच्या प्रसूतीस अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती ग्राहक संरक्षण परिषद सदस्य ॲड. शशिकांत नरुटे यांनी दिली.
संतंत धार पावसाची रिप रिप अशा परिस्थितीत मध्यरात्री कोणाला फोन करावा कोण ऐवढया रात्री मदत करेल असे अनेक विचार मनात येऊ लागले आसता विधी सेवा प्राधिकरण जिल्हा सोलापूर सदस्य मोहोळ तालुक्यातील राजन घाडगे यांना फोन केला त्यानी तात्काळ फोन रिसीव्ह केला व बोला नरुटे साहेब काय अडचण असा प्रश्न विचारला आसता मन भरुन आले त्यांना सविस्तर माहिती सांगितली त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा पूरग्रस्त मदत कक्ष अधिकारी संतोष सरडे यांना सविस्तर माहिती द्या म्हणून सांगितले व फोन कॉन्फरन्स करण्यात आला. रात्री दोन वाजता संपर्क साधण्यात आला. विशेष म्हणजे, त्यांनी पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलून संपूर्ण माहिती शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी त्वरित संबंधित आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला.
तर मदतीसाठी राजन घाडगे यांनीही तत्काळ प्रतिसाद देत पहिल्याच रिंगमध्ये फोन स्वीकारला. परिस्थिती समजून घेताच त्यांनी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेशी त्वरित संपर्क साधण्यांस प्रोत्साहित करित महिलेच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रयत्न केला.
त्यांच्या समन्वयामुळे आणि तत्परतेमुळे योग्य उपाय योजना केल्या गेल्या आणि संबंधित महिलेला तात्काळ आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून दिली गेली. त्या सुखरूप प्रसुती झालेले आहेत बाळ व बाळाची आई हे सुखरूप असून त्याच्या कुटुंबीयांकडून यंत्रणेबद्दल खूप खूप कौतुक होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारां पासून रात्रभर सोबत राहात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शशिकांत नरुटे यांनी अथक प्रयत्न केल्याने या कुटुंबियांनी त्यांचे ही आभार व्यक्त केले.
ही घटना प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे व तत्परतेचे जिवंत उदाहरण असून, रात्रीच्या अंधारातही माणुसकीचा उजेड देणाऱ्या संतोष सरडे अधिकाऱ्यां सह सामाजिक पदाधिकारी घाडगे यांचे काम कौतुकास पात्र असल्यांचे सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. शशिकांत नरुटे यांनी सांगितले.
