करमाळा प्रतिनिधी – समशेर पठाण
काल दिनांक १३ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्यातील वाघाची वाडी गावांमध्ये विजांच्या कडकडात सह जोरदार पाऊस पडला. एका शेतकरी महिले वरती वीज कोसळली त्याच्यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. शांताबाई बाळू वाघ वय 42 वर्ष असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.
त्या शेतात शेतीची कामे करत होत्या त्यांच्यासोबत आणखी एक दुसरी महिला ज्योती वाघ यादेखील होत्या, त्यादेखील जखमी झाल्या आहे त्यांच्यावरती करमाळा येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे.
पहिल्या घटनेपासून 1000 ते 1200 फुट अंतरावर घडलेली दुसरी घटना कांतीलाल तुळशीराम वाघ वय 38 यांच्या पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे हा प्रकार घडला त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते व त्यांच्या पत्नी विद्या कांतीलाल वाघ वय 31 काम करत असताना विज पडल्या नंतर हे काही कळायच्या आतमध्ये झटकून खाली पडले व किरकोळ जखमी झाले आहे… दोघेही करमाळा येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत.
शांताबाई वाघ यांच्या पाश्चात पती एक मुलगा व मुलगी आहे. यांच्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.



