खडकी पुणे –
ऑल सेंट्स हायस्कूलमध्ये 79 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी कृष्णा सांगळे यांनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.

ध्वजारोहणाचा मान प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक कैलास पिंगळे यांना मिळाला. विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा सादर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रभावी सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग आणि मान्यवरांची मने जिंकली. निवडक विद्यार्थ्यांनी थोर नेत्यांना मानवंदना अर्पण केली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही रंगतदार सादर झाले.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. जस्सी जयसिंग, बॉबी मरिअम्मा, शाळेचे संचालक डॉ. जयसिंग डी, समन्वयक श्रद्धा मतकर, ॲलन देवप्रियम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची शिस्तबद्ध मांडणी आणि यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक व कर्मचारी वर्गाचे संचालक डॉ. जयसिंग डी आणि डेव्हिड पिल्ले यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाची माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी दिली.



