पुणे : बोरीभडक (ता. दौंड) बोरीभडक गावचे सुपुत्र आकाश संभाजी गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या विशेष प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल जगदाळे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, गणेश थोरात, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, दिलीप हंडाळ यांसह मान्यवर उपस्थित होते.
आकाश गव्हाणे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, युवकांमध्ये नेतृत्वगुण व संघटन कौशल्य यासाठी ते परिचित आहेत. त्यांच्या या निवडीमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे



