पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी –

नुकतेच पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकूण 30 शाळांतील २७४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. द्वितीय क्रमांक मार्शल आर्ट पॉईंट अकॅडमी, चिंचवडगाव यांनी तर तृतीय क्रमांक आदित्य इंटरनॅशनल स्कूल, आळंदी डुडुळगाव, तसेच चतुर्थ क्रमांक ऑल सेट्स हाय स्कूल, पिंपळे गुरव यांनी मिळवला.

या स्पर्धेतून सुवर्ण व रोप्य खेळाडूंची राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अकमल खान यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभात बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अझम खान राष्ट्रीय थायबॉक्सिंग संघटना संस्थापक अध्यक्ष पाशा अतार, सुनील साठे, रविराज गाढवे, योगेश खराडे, प्रियंका मॅडम आणि नरेश परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी पंच म्हणून आयोजनामध्ये नाझीम शेख, किरण माने, सानिया शेख, अबरार खान, आसिफ शेख व दम्यंती महाजन यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन गणेश मांढरे व अभिषेक शिंदे यांनी केले.

राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धा २५, २६ व २७ जुलै २०२५ रोजी नागपूर येथे होणार आहे या स्पर्धेत ऑल सेट्स हाय स्कूलने चमकदार कामगिरी केली तसेच राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली म्हणून शाळेचे संचालक जयसिंग डी डेव्हिड पिल्ले मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग समन्वयक श्रद्धा मतकर ॲलन देवप्रियम यांनी अभिनंदन करत यांना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला. निवड झालेली खेळाडू खालील प्रमाणे 1)देविका साठे सुवर्णपदक 2) सई सांगळे सुवर्णपदक 3) उबेद शेख सुवर्णपदक 4) कृष्णा सांगळे सुवर्णपदक 5) अभया गरुकडे 6) अमृता गायकवाड रोप्य पदक 7) संस्कृती कामठे रोप्य पदक 8) दिलीप चौधरी रोप्य पदक 9) प्रदीप साळेकर रोप्य पदक 10) देवांश गायकवाड रोप्य पदक 11) आरोही बेडके कास्यपदक 12) आर्यन जगताप कास्यपदक 13) श्रेया घोडके कास्यपदक 14 ) प्रज्ञेश कांबळे कास्यपदक या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे परवेज शेख यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *