पै.पृथ्वीराज भैय्या साहेबांनी जिल्हा परिषद लढवावी- नितीन तरंगे

सोलापूर प्रतिनिधी – सुशील नरूटे

खरं तर जिल्हा परिषद लढवण्यासाठी कामाचा व अनुभवाचा असा कोणताही क्रायटेरिया नाही मात्र जरी तसा काही क्रायटेरिया असता तर पृथ्वीराज भैय्या बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असते, इतकं मोठया प्रमाणात काम आणि दांडगा जनसंपर्क भैय्यासाहेबांनी गेल्या दशकभरात स्वकर्तुत्वाने निर्माण केला आहे.

जेऊर गावच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेले पृथ्वीराज भैय्या पाटील आज त्यांच्या कर्तृत्वाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती पर्यंत जाऊन पोहोचले आहेत.प्रत्येक गावात पृथ्वीराज भैय्यानी युवा कार्यकर्त्यांची एक फौज निर्माण केली आहे.गावखेड्यातील लहान पोरांपासून ते जेष्ठ माणसांपर्यंत भैय्यासाहेबांचं कर्तृत्व कोणापासूनही लपलेलं नाही.

सकाळपासून-संध्याकाळ पर्यंत रात्री-अपरात्री वर्षाचे बाराही महिने भैय्यासाहेबांचं लोककल्याणकारी काम अखंड सुरू असत.
एखाद्या कामासाठी तुम्ही भैय्यासाहेबांना फोन केला तर ते स्वतः तो फोन रिसीव करतात.त्यावेळी तुम्ही फक्त काम सांगायचं तुम्ही कोणत्या गटाचे अथवा कोणत्या पार्टीचे आहात याने त्यात काहीच फरक पडत नाही. पृथ्वीराज भैय्यांसाठी गट-तट महत्वाचा नसून जनतेच्या समस्या निकाली काढणे हे सर्वांत महत्वाचं आहे.

तालुक्यातील जनतेवर समस्या आल्यावर भैय्यासाहेब सर्वांत पुढे असतात,कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळ्यावर भैय्यासाहेब त्यांचा आधार बनतात.सहकाऱ्यांच्या सुखात भैय्यासाहेब आपला हात त्यांच्या खांद्यांवर ठेवतात.अश्या मनमिळावू नेत्याला आजघडीला तालुक्यात विरोधक शोधून सापडणार नाही.

भैय्यासाहेबां सारखा कर्तृत्वान डॅशिंग चेहरा जिल्हा परिषदेत गेला पाहिजे हीच एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *