जामखेड प्रतिनिधी.अमृत कारंडे.
जामखेड शहरात दादा या नावाने ओळखले जाणारे. नामा .वैदयकीय क्षेत्रात हात खंडा असलेले डॉ. डि.बी.खैरनार यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधुन दर वर्षी रक्त दान शिबीर आयोजित केले जाते.
खैरनार प्रतिष्ठान च्या वतीने हे रक्त दान शिबीर घेण्यात येते. या वर्षी 41जनानीरक्त दान केले..
गेली पंचवीस वर्षे सातत्याने खैरनार प्रतिष्ठान रक्त दान शिबिर आयोजित करत आहे.. सामाजिक देने लागतो. ते आपण परत केले पाहिजे. समाज सेवा महणून शिबीर घेण्यात येत आहे..
डॉ. खैरनार दादा यांनी जवळ जवळ पन्नास वर्ष वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाज सेवा केली..
ऋगणाकडे पैसे असोत किंवा नसोत दादांनी वैदयकीय सेवा मनोभावे केली. पैसे नाहीत म्हणुन वैदयकीय सेवा कधीच नाकारली नाही.. असे डॉ. सध्या च्या काळी मिळने दुरापास्त आहे. शोधून ही सापडले अवघड आहे.. निखळ सेवा भाव समोर घेऊन काम करणारे दादा खैरनार परिसरात प्रसिद्ध होते.
त्यांचा वारसां ज्यांचे कुटुंबीय पुढे चालवत आहे.
या शिबीराचे उदघाटन मा.चांदेकर सर यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी डॉ. प्रकाश खैरनार..डॉ.मुनोत. जन कल्याण रक्त पेढीनगर.रमेशशेठगुगळे.शांतीलाल गुगळे.उमेश देशमुख.अशोक पितळे. बापु देशपांडे. आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.. गेली पंचवीस वर्षे झाली नगर येथील जन कल्याण रक्त पेढी..रक्त संकलन करत आहे. रक्त दान शिबीर संपन्न होण्यासाठी मदत करत आहे.