कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये शितलताई ऋषिकेश धांडे आघाडीवर; विकासाची नवी दिशा देण्यास जनतेची उत्स्फूर्त मागणी

कर्जत तालुका प्रतिनिधी

कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषदगट निवडणुकीत शितलताई ऋषिकेश धांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली असून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी जनतेकडून जोरदार मागणी होत आहे. “तिकीट शितल ताईंनाच मिळाले पाहिजे”, अशी एकमुखी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास, जमिनीवरची मजबूत कामगिरी आणि सर्वांशी जिव्हाळ्याचा संवाद यामुळे त्यांच्याभोवती प्रचंड जनसमर्थन एकवटले आहे.

आमदार रोहित दादा पवार यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून शितलताई ऋषिकेश धांडे ओळखल्या जातात. आमदार रोहित दादा पवार विकासाभिमुख कार्यपद्धती आणि शितलताई ऋषिकेश धांडे जनसंपर्कशक्ती — या दोन गोष्टी ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण करत आहेत.

शितलताई ऋषिकेश धांडे ह्या नागरि शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा आहेत.गावापासून संपूर्ण कोरेगाव – चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये ठोस कामे केली आहेत. त्यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शाळांचे उन्नतीकरण आणि समाजकार्य यांमुळे ग्रामस्थांच्या मनात त्यांच्याविषयी एक विश्‍वासार्ह प्रतिमा निर्माण झाली आहे.

गाव भेटींना उस्फूर्त प्रतिसाद

शितलताई ऋषिकेश धांडे यांच्या गावभेटी मोहिमेला महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक—सर्व घटकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक भेटीत त्यांच्यावरील विश्वास उंचावत असून, मतदारसंघात त्यांच्य समर्थनाची लाट स्पष्ट दिसू लागली आहे.

जिंकून आल्यास ठोस विकासाचा रोडमॅप मूलभूत सुविधा — पाणी, रस्ते, वीज, शाळा — यावर तातडीचे कामग्रामपंचायतस्तरील प्रलंबित कामांना गतीशेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना आरोग्य व स्वच्छता उपक्रमांचा मजबूत पाया महिलांसाठी विशेष उपक्रम

शितलताई ऋषिकेश धांडे यांची विशेष ओळख म्हणजे ‘महिलांसाठी विकासाचा संकल्प’—

महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण

बचतगटांना आर्थिक बळ

शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित

महिलांच्या समस्या सोडवणारी विशेष कार्यपद्धती

अनेक गावांमधून एकच सूर उमटतो आहे `शितलताई ऋषिकेश धांडे यांनी ज्या पद्धतीने काम केले, लोकांशी नातं जोडले, त्याचमुळे या वेळी तिकीट त्यांनाच मिळाले पाहिजे.”

कोरेगाव-चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये निर्माण झालेला हा सकारात्मक विकासाचा माहोल आगामी निवडणुकीला विशेष महत्त्व देत असून, शितलताई ऋषिकेश धांडे व्यापक जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *