नवनाथ चव्हाण – पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक
करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) १३ उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीया-सोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवत असल्याचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी स्पष्ट केले. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही रणनीती बदल होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नगरपालिकेतील एक नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सुरुवातीलाच महायुतीच्या नावाने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. राष्ट्रवादीच्या वतीने घड्याळ चिन्हावर दाखल झालेले उमेदवार असे आहेत —
*महादेव फंड *बानू जमादार, अशपाक जमादार, स्वाती फंड, ऋषिकेश शिगजी, गणेश माने, सुवर्णा जाधव, प्रशांत जाधव, धनश्री दळवी, तेजल मोरे, आणि सुहास ओहोळ*.
दुसरीकडे, महायुतीतील शिवसेनेने (शिंदे गट) माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वात स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते“.
भाजपने सुनीता देवी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून, त्यांचे पती कन्हैयालाल देवी यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. भाजपने सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार दिल्याने, भाजप आणि राष्ट्रवादी यात खरी युती दिसून येते का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
अंतिम क्षणी राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



