स्व.डॉ.प्रदिपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या स्मरणार्थ आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील जनावरांसाठी साडे तीन टन (साठ बॅग) मुरघास मा. तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष करमाळा शिल्पा ठोकडे मॅडम यांचे कडे सुपूर्द करण्यात आला.
गोरगरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी एक हात मदतीचा याप्रमाणे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून करमाळा येथील आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील जनावरांसाठी चारा मिळावा म्हणून साडे तीन टन मुरघास ( साठ बॅग) मा. तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पा ठोकडे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यावेळी नायब तहसीलदार श्री विजय लोकरे साहेब, श्री शत्रुघ्न चव्हाण साहेब, डॉ श्री सतिश देवरे साहेब
आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ .रोहन पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, अभिजीत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष श्री भरत भाऊ आवताडे , श्री सुजित तात्या बागल, श्री रमेश आण्णा कांबळे, श्री अशपाक जमादार, श्री नितीन राजेभोसले, पत्रकार श्री जयंत दळवी, श्री तात्यासाहेब जाधव, श्री राहुल जाधव ,सूरज ढेरे, विशाल लेंडवे,चेतन जाधव, अवधूत घाडगे, तुषार जाधव,दिपक शिंगटे, नागनाथ शिंगटे, संदीप घाडगे, सुशांत जाधव,शरद नलवडे,आजिनाथ काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आणखी काही पूरग्रस्त भागातील नागरिकांना किंवा जनावरांना मदतीची आवश्यकता लागल्यास आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था मदत करण्यास कटिबद्ध राहील असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील यांनी सांगितले