जामखेड प्रतिनिधी : अमृत कारंडे.
गोरगरीबांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले नासीर चाचू सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाने जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, निराधार, वंचित घटकांसाठी विविध पातळ्यांवर काम करत असलेल्या नासीर चाचू सय्यद यांची ओळख सर्वसामान्यांचा माणूस म्हणून आहे. मदतीसाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला ‘नाही’ हा शब्द न बोलणारे, समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे.
त्यांच्या या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांनी नासीर चाचू सय्यद यांच्या नावावर विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक ९, सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी उमेदवारी घोषित केली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या या निर्णयाचे नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून प्रभागात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. गोरगरीबांचा आवाज राजकारणात अधिक बुलंद होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.



