स्वर्गीय गणपतराव जी देशमुख साहेब यांना भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली गणपतराव देजी देशमुख हे सांगोला दुष्काळी तालुका म्हणून संबोधलेला होता. परंतु गणपतराव देशमुख साहेब यांनी सांगोला तालुक्याचा विकास करू काया पालट केला. गोरगरीब जनतेची त्यांनी सलग 55 वर्ष सेवा केली.
एकाच पक्षाकडून एका चिन्हावर सांगोला विधानसभा निवडणूक सतत 55 वर्ष जिंकली विश्वविक्रम केला गिनीज बुक मध्ये अशा या महान नेत्याची नोंद झाली आहे. सांगोला तालुका सुजलम सुफलं मकेला सांगोला तालुक्याला पाणी मिळावे म्हणून त्यांनी आपले संपूर्ण हयात सांगोला तालुक्याच्या विकासासाठी घालवली विकास काय असतो तो सांगोल्यातील जनतेने पाहिला महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम गणपतरावजी देशमुख साहेब यांनी केले.
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांना भारतरत्न किताबाने गौरविण्यात यावे अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी दादासाहेब महानवर, कैलास पवार ,आजिनाथ इरकर, गणेश इवरे ,दादासाहेब खोमणे ,दिनकर हुलगे, समाधान मारकड ,धनाजी कोळेकर, किशोर शिंदे, निलेश कोकरे ,नवनाथ कोळेकर, नितीन तरंगे, संदीप मारकड ,दादासाहेब नरोटे ,आधी जन पदाधिकारी उपस्थित होते.