उच्चशिक्षित तरुणाने शेती व समाजसेवे कडे लक्ष केले केंद्रित
नाव दत्ता उर्फ गुरुदास पांडुरंग ठोंबरे यांचा जन्म 4 मार्च 1996 रोजी करमाळा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यामध्ये हिसरे ता.करमाळा जिल्हा सोलापूर या गावांमध्ये छोट्याशा शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला.
4 मार्च म्हणजेच त्यांचा आज जन्मदिवस त्यांना ए बी एन एक्सप्रेस न्यूज चैनल च्या सर्व प्रतिनिधींकडून संपादक मंडळाकडून तसेच महाराष्ट्रातील ए बी एन एक्सप्रेस न्युज चे सर्व चाहते यांच्याकडून गुरुदास ठोंबरे यांना जन्म दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी झाले.तर माध्यमिक शिक्षण हे सिध्देश्वर विद्यालय हिसरे या ठिकाणी घेतले. तर उच्च शिक्षण हे पुण्यातील नामांकित कॉलेज म्हणजे एस.पी. कॉलेज या ठिकाणी झाले.
शिक्षण घेत असताना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली, या साठी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या पत्रकारिता या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्धार केला. निर्भिड पत्रकारितेतून कोरोना काळात अनेक कोरोना रुग्णांना दवाखान्यासाठी मदत करून कोरोना युद्धाचे कर्तव्य बजावले. समाजसेवे बरोबरच शेती करण्याचा निर्णय घेतला.शेतीत नवीन नवीन प्रयोग करण सुरू केलं.
राजकारण हा आवडीचा विषय असल्यामुळे गावातील राजकारणाची आवड निर्माण झाली. यामुळे 2020 मध्ये ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा मानस केला, परंतु हल्लीच्या युगामध्ये प्रामाणिक सामाजकार्य करणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्यापेक्षा धन बलाढ्य उमेदवाराची पाठराखण केली जाते याचा विचार करून उच्चशिक्षक दत्ता ठोंबरे यांनी आपला विचार बदलला. व येणाऱ्या काळात एल.एल.बी. सारख्या कायद्याचा अभ्यास करून तसेच निर्भिड पत्रकारीता करून सर्वसाधारण जनतेला न्याय देणे अन्यायाला वाचा फोडणे अशी लोक हिताची कामे करण्याचा ध्यास डोळ्यासमोर ठेवला.
“महाराष्ट्रातील नव्याने उदयास आलेले नवीन न्यूज चैनल म्हणजे *ए बी एन एक्सप्रेस न्यूज* मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नेतृत्व करण्याचे ठरवले व त्यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी ए बी एन एक्सप्रेस न्युज चे मुख्य संपादक माननीय अशोक नरूटे यांनी त्यांना मोलाची संधी दिली, व त्या संधीचे ते नक्की सोनं करतील ही महत्त्वकांक्षा बाळगली. या ए बी एन एक्सप्रेस न्यूज चैनल च्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवण्यााठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
त्याचबरोबर समाज हितासाठी आपण भविष्यात नक्कीच राजकारणात देखील उतरण्याची इच्छा व्यक्त केली.