वन मिशन बुलढाणा तथा राजश्री शाहू बँक श्री. संदीप दादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर | ABN Express News
दशरथ गायकवाड- मेहकर तालुका प्रतिनिधी
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे राजश्री शाहू बँक अध्यक्ष. संदीप दादा शेळके यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून देऊळगाव साखरशा येथे सौ. कांता देवी डाळे ब्लड सेंटर वाशिम यांच्यामार्फत देऊळगाव साखरशा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. सर्वप्रथम थोर महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात केली. देऊळगाव साठ वर्षा नगरीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बी एम राठोड यांनी रक्तदान केले व एकापाठोपाठ दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद बापू देशमुख व गावातील प्रतिष्ठित मंडळी हजर होते. देऊळगाव साखरशा गावचे सरपंच श्री.संदीप आल्हाट व ग्रामपंचायत सदस्य रंजीत बापू देशमुख, बाळू भाऊ वानखेडे, विपुल देशमुख, पत्रकार नवल राठोड, भैय्यासाहेब देशमुख, पन्नालाल बेगानी, महादेव तोडेकर, दशरथ गायकवाड, पंढरी तोंडे, परसराम चव्हाण, मधुकर महादेव तोंडे, तसेच राज्यश्री शाहू बँक कर्मचारी मॅनेजर श्री. नामदेव चव्हाण, दीपक राठोड, राहुल पांढरे, सुनील पवार हे उपस्थित होते आणि रक्तदान केलेले दान दाते संदीप पवार संदीप लढ वासुदेव लढ बाजीराव काळे दीपक राठोड अन्सार पठाण किसन पासपोर्ट गोटू भाऊ नवत्रे यश आल्हाट यांनी रक्तदान केले.