तडिपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील तडिपार आरोपी चेक करुन कोणता तडीपार आरोपी हा विना परवाना चोरुन पोलीस ठाणे हद्दीत राहत आहे का याबाबत तपास करत असताना ०६ फेब्रुवारीला पोलीस शिपाई शशांक खाडे व पोलीस शिपाई विकास मरगळे यांना त्याच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतुन दि ०३/०८/२०२२ रोजी तडीपार केलेला आरोपी आफताब उर्फ बडापाडा राजु पठाण (रा. गणेश अपार्टमेन्ट, भाग्योदय नगर, कोंढवा, पुणे) हा पारसी ग्राऊंड, शिवनेरी कोंढवा येथे सिगरेट ओढत थांबलेला दिसला सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्याची तडीपारीची ऑर्डरची खात्री केली असता तो तडीपारी संपण्याच्या अगोदर पुणे शहर हद्दीत मिळुन आला म्हणुन वरिष्ठांच्या आदेशाने त्यास पोलीस आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे तडीपार आदेश नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम ५६(१) (अ) (ब) अन्वये पुणे शहर पोलीस आयुक्तलाय पिंपरी शहर पोलीस आयुक्तलय व पुणे जिल्हयातुन १८ महिन्या करीता तडीपार केले असताना सदर आदेशाचा भंग करुन मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सदर आरोपी विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयाची माहिती.
१) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०१५/२१ आर्म अॅक्ट ४ (२५) म पो का क ३७(१) (३) १३५
२) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०९/२० भादवि कलम ४५४,४५७,३८०
३) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७५/२० भादवि कलम ३७९, पोस्को कलम ४४
४) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००८/२१ भादवि कलम ३७९
५) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०३०/२१ भादवि कलम ३७९
६) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७६१/२१ भादवि कलम ३७९
७) कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५४०/२२ आर्म अॅक्ट ४(२५)
सदर कामगिरी अमितेशकुमार पोलीस आयुक्त, रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पूर्वे प्रादेशिक विभाग, ए.राजा पोलीस उप आयुक्त परि.०५,शाहुराव साळवे सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलिस ठाणे, संदिप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पो ठाणे, मा. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलिस ठाणे, यांच्या मागदर्शनाखाली लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक, दिनेश पाटील सहा पोलिस निरीक्षक,पोलिस हवलदार. अमोल हिरवे, पोलिस हवलदार. राहुल वंजारी, पोलिस अमलदार. अभिजित रत्नपारखी, पोलिस अमलदार. जयदेव भोसले, पोलिस अमलदार. राहुल रासगे, पोलिस अमलदार. सुहास मोरे, पोलिस अमलदार, राहुल थोरात, पोलिस अमलदार. अशिष गरुड, पोलिस अमलदार. रोहित पाटील, पोलिस अमलदार. अक्षय शेडगे, पोलिस अमलदार. विकास मरगळे, पोलिस अमलदार. शशांक खाडे यांचे पथकाने केली.