कृष्णप्रिय गोशाळा किनवट येथे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
कृष्णप्रिय गोशाळा किनवट जि नांदेड यांनी गोविज्ञान प्राकृतिक तथा स्वावलंबी ग्राम निर्माण प्रशिक्षण शिबिर पाच दिवसीय आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर यांचा प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
गोमय पंचगव्य सेंद्रिय शेती गोमातेचे सेवा स्वालंबीग्राम निर्माण गोविज्ञान पंचगव्य परिचय त्रिफळाचूर्ण दंतमंजन कर्ण औषधी वैदिक कुंकू गोअ मृत घनवटी पंचगव्य अमृत मेथी दाना जीवामृत गोकृपा जीवमृत साबण नस्य अर्क नेत्रअर्क सौंदर्य अर्क पाचक रस अनेक गोआधारित विष मुक्तशेती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खताचा अतिरिक्त वापर फवारणी औषधांचा अतिवापर यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे, लोकांना रासायनिक फवारणीच्या औषधामुळे अनेक आजार होऊ लागल्यामुळे पुढच्या काळामध्ये सेंद्रिय शेती शिवाय पर्याय राहिलेला नाही. करमाळा तालुक्यामध्ये गावागावांमध्ये जाऊन गोआधारित सेंद्रिय शेती करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
गोमातीची सेवा केल्यानंतर कुठलाही आजार होत नाही. मन प्रसन्न राहत आहे, शेणा पासून गोमूत्र पासून अनेक प्रॉडक्ट तयार करण्यात येत आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती सुरेंद्र देशपांडे कर्नाटक, विश्व भोसले नांदेड, संजय घोगरे नांदेड,राजेंद्र देवनी कर, कृष्ण प्रिय गोशाळा अध्यक्ष काका साहेब तसेच दहा राज्यातील गोप्रेमी उपस्थित होते.