Tuesday, December 3, 2024
पुणे

नागरिक आणि व्यवसायिकांसाठी बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ


नागरिकांच्या सोयीसाठी आपण बांधकाम परवानगीबाबत कागदपत्रांच्या अटींमध्ये शिथिलता आणली आहे. काही कागदपत्रे कमी केली आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. दीड महिन्यात सव्वाशे अर्ज दाखल झाले आहेत.

योगेश म्हसे.आयुक्त पीएमआरडीए

बांधकाम परवानगी प्रक्रिया सोपी व्हावी,आणि खोळंबलेल्या अर्जाचा निपटारा लवकर व्हावा, यासाठी पी.एम.आर.डी. ने तब्बल ४४ कागदपत्रे कमी केली. महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेऊन जवळपास दीड महिना उलटला. या दरम्यान पीएमआरडीए कार्यालयातील विकास परवानगी विभागात तब्बल १२५ अर्ज परवानगीसाठी आले आहेत. ही संख्या तुलनेने वाढली आहे.

आता केवळ ८९ कागदपत्रे

Advertisement

पी.एम.आर.डी.ए. मध्ये बांधकाम परवानगी व विविध कारणांसाठी नागरिकांना पूर्वी १३३ प्रकारची कागदपत्रे द्यावी लागत होती. त्यामध्ये आता सुटसुटीत पणा आणल्यामुळे ८९ कागदपत्रेच द्यावी लागणार आहेत.  ४४ कागदपत्रे कमी झाली आहे. त्यामुळे त्यावर निर्णय घेणे-देखील सोपे झाले आहे.

तरीही प्रकरणे होणार दाखल

पी.एम.आर.डी.ए.मध्ये यापूर्वी अर्जदारांना अग्निशामन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वृक्ष समितीची परवानगीदेखील लागत होती. अनेक अर्ज या दोन कारणांमुळे प्रलंबित राहत होते. त्यावर आक्षेप वाढत असल्याने त्या फाइल तेथेच अडकून पडत. दरम्यान, आता ही दोन कागदपत्रे जोडली नसली तरी प्रकरणे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, संबंधित प्रस्तावावर अंतिम निर्णय झाल्यानंतर या दोन्ही विभागांची परवानगी आवश्यक असणार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!