Sunday, October 6, 2024
ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण गोपीचंद पडळकरच मिळवून देतील -अण्णासाहेब सुपनवर


महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण गोपीचंद पडळकरच मिळवून देतील -अण्णासाहेब सुपनवर

महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचे आरक्षण बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेबच मिळवून देणार असा विश्वास महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी व्यक्त केला.

गेली 70 ते 75 वर्षे झालं धनगर समाजाला प्रस्थापित मंडळींनी आरक्षणापासून वंचित ठेवले धनगर जमात ही विश्वासावर चालते परंतु या प्रस्थापित राजकर्त्यांनी धनगर समाजाचा वापर मतदानासाठी करून घेतला, भोळा – बाबडा समाज राना – वनामध्ये फिरणारा शेळ्या – मेंढ्या घेऊन डोंगर दर्या कपारी मध्ये राहणारा हा समाज बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जागा केला, धनगर समाज हा आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून एकजूट त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेला आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी हाती घेतलेलं काम तडीस नेतात, असा त्यांचा स्वभाव आहे.

Advertisement

हातामध्ये माती धरली तर त्याचं सोनं करण्याचं काम पडळकर साहेब करत आहेत, परिवहन मंडळातील कामगारांना पगार वाढवून देण्याचे काम आमदार पडळकर साहेब यांनी केले महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचे एसटीचे आरक्षण आमदार पडळकर साहेबच मिळवून देतील, असा विश्वास तमाम धनगर समाजाला वाटत आहे.

 


यावेळी धनगर समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष दादासाहेब महानवर, वैजनाथ तरंगे, अंकुश हंडाळ, कल्याण कोपनर, निलेश कोकरे, धनाजी शिंदे, नवनाथ कोळेकर, भालचंद्र इवरे, कैलास पवार , तात्या काळे, बाळासाहेब माने, निलेश वाघमोडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!