Sunday, October 6, 2024
राजकीय

भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री गणेश भाऊ चिवटे यांच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपा पक्षाची संपूर्ण ताकद उभी करणार…..


भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.गणेश भाऊ चिवटे यांच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपा पक्षाची संपूर्ण ताकत उभी करणार असलेचे प्रतिपादन भाजपाचे सोलापूर (प) चे अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.

तालुक्यातील मौजे मिरगव्हाण येथील शेतकरी मेळावा आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की,गणेश चिवटे हे हिंदुत्ववादी विचारावर चालणारा कार्यकर्ता असून गेल्या वीस वर्षात भाजपा पक्षाचे काम त्यांनी संपूर्ण ताकदीने उभे केले आहे. विविध सामाजिक उपक्रम,शैक्षणिक उपक्रम यासोबत दुग्ध व्यावसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना त्यांनी रोजगाराचे साधन दिले आहे.त्यामुळे जनतेच्या मनात त्यांनी विश्वासाचे घर केले असून त्यांनी आता सक्रिय राजकारणात उतरले पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे.

Advertisement

भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपणास ग्वाही देतो की,गणेश चिवटेना आपल्याला अपेक्षित असणाऱ्या पदापेक्षाही मोठे पद मिळेल यासाठी पक्षाची संपूर्ण ताकत मी त्यांच्या पाठीशी उभी करेन असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार म्हणाले की,गणेश चिवटे यांनी आजवर दुग्ध व्यावसायासोबत,विद्यार्थी, निराधार लोकांना जेवणाची सोय करून दिली, सामुदायिक विवाह सोहळ्यातून शाही थाटात अनेकांची लग्न लावून दिली,बांधकाम कामगारांना अनेक योजना मिळवून दिल्या, मल्लासाठी निकाली कुस्त्यांची मैदाने भरवली.

यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन मिरव्हाणचे माजी सरपंच मच्छिंद्र हाके व ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खाडे यांनी केले होते.प्रस्ताविक खेलबा ठोंबरे यांनी केले,सूत्रसंचालन भाजपा जिल्हा चिटणीस विनोद महानावर यांनी केले तर आभार भाजपा सहकार सेलचे अजिनाथ सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव, तालुकाध्यक्ष श्री. रामभाऊ ढाने,तालुका सरचिटणीस श्री.नितीन झिंजाडे,श्री.अशोक सातपुते तसेच विविध पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!