केम परिसरात दोन दिवस ड्रोनच्या घिरटया नागरिकात भीतीचे वातावरण
केम प्रतिनिधी – संजय जाधव
केम परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्री दहाच्या सुमारास ड्रोन आकाशात घिरटया घालत असल्याचे पाहिल्याने नागरिकांची व शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
तसेच आकाशातील ड्रोनमुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात असून अनेक मोठया अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पोलीसांनी त्वरीत लक्ष देण्याची आवश्क्यता आहे.
करमाळा तालुक्यात गेल्या महिन्यापासून काही गावात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या डो्नमुळे अनेकांची डोके दु,खी वाढली आहे, डो्नचे संकट केम परिसरातील पाथुडीं,घुटकेश्वर, भोगेवाडी, ढवळस, केम शिवार बाराबाई वस्ती, देवकर वस्ती या परिसरात रात्री,९ ते १० च्या सुमारास डो्न फिरल्याचे प्रत्यक्ष दशींने सांगितले.
डो्नच्या साह्याने परिसराची पाहणी करून मोठया चोऱ्या होण्याच संभव असल्याची अफवा केम परिसरा पसरली आहे, अचानक पणे रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या डो्नमुळे शेतकऱ्याची झोप उडाली पठाड शिवारातील बिचितकर वस्तीवरील तरूनंनी वस्तीच्या संरक्षणासाठी रात्रभर जागरण केले असल्याची माहिती दत्तात्रय बिचितकर यानी सांगितली, पोलीसानी याचा बंदोबस्त करावा असी मागणी ग्रामस्थानी केली.