पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन
भरत वाल्हेकर यांच्या नियोजनामध्ये माजी मंत्री रमेश दादा बागवे आणि प्रदेश प्रवक्ते गोपालदादा तिवारी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन
आज अजंठा नगर भोपळे चौक येथे काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मा. श्री. रमेश दादा बागवे (माजी गृहराज्यमंत्री ) मा. श्री. गोपाल दादा तिवारी (प्रवक्ते महा. प्रदेश काँग्रेस कमिटी ) यांच्या हस्ते व श्री भरत वाल्हेकर (वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक विश्वास गजरमल यांच्या उपस्थितीत झाले.
सदर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना श्री. रमेश दादा बागवे यांनी असे सांगितले की जनसंपर्क कार्यालय व शाखेची स्थापना हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे जेणेकरून काँग्रेस पक्ष या उपक्रमामार्फत घरोघरी पोहोचत आहे, असेच अनेक ठिकाणी देखील काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय व शाखा यांचे उद्घाटन करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला काँग्रेसमय करण्यासाठी रमेश दादा बागवे यांनी भरत वाल्हेकर, विश्वास गजरमल व पदाधिकारी – कार्यकर्त्यांना आव्हाहन केले आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये श्री गोपाल दादा तिवारी यांनी त्यांच्या भाषणातून स्किल इंडिया अंतर्गत मोफत शिलाई मशीन व कॉम्पुटर क्लास हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि या उपक्रमाला त्यांची देखील खूप प्रशंसा मिळाली . सर्व उपक्रमांना पाहता रमेश दादा बागवे आणि गोपाल दादा तिवारी यांनी भरत वाल्हेकर यांना या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या व असेच उपक्रम भविष्यात राबवण्यासाठी सदैव पाठीमागे उभे राहण्याचे वचन दिले.
कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय व पक्षशाखा स्किल इंडिया अंतर्गत मोफत शिलाई मशीन व कम्प्युटर क्लासेस चे उद्घाटन करण्यात आले तसेच रमेश दादा बागवे गोपाल दादा तिवारी आणि भरत वाल्हेकर यांच्या हस्ते कु. प्रणव गजरमल यांचे इंग्लंड येथून मँचेस्टर युनिव्हर्सिटीची एम एस पदवी संपादन केल्याबद्दल भव्य सत्कार देखील करण्यात आला .
यावेळी सभापती अभिमन्यू दहितूले, महिला अध्यक्षा सायलीताई नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष विजय ओव्हाळ, डॉक्टर सेल अध्यक्षा डॉ. मनिषा गरुड, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे व कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष बी. बी. शिंदे, औद्योगिक विभाग अध्यक्षा प्रतिभा कांबळे, ज्येष्ठ नेते सुनिल राऊत व संदेश नवले, जितेंद्र छाबडा, आप्पा कांबळे, राम ओव्हाळ, प्रमोद शेलार, रावसाहेब सरोदे , दिलीप जोंधळे , माणिक गजरमल ,राहुल साळुंखे ,सुग्रीव लोंढे , वाल्मीक साठे , कचरू सरवदे , दीपक कांबळे , भाऊ वाघमारे , सोमनाथ शिंदे , यंकप्पा धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील कार्यकर्त्यांचा सदर कार्यक्रमांमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला गौरीताई शेलार ,चंपाताई धोत्रे ,राहुल साळुंखे ,शत्रुघन ओव्हाळ , अनिल साबळे ,सुनील दाभाडे