स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 2024 रोजी जि. प. प्रा शाळा खांबेवाडी येथे, अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पै.अशोक गोफणे( मनसे ता. उपअधक्ष) यांच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण (थ्री फोर वही पेन प्रमाणपत्र) व गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान केला. तसेच गावातील नामवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला व आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय आणि ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सन्मान केला गेला, तसेच बक्षीस व सत्कार हा गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच अतिशय उत्साहाने हजेरी देखील लावली होती. तसेच गावातील अनेक पाल्यांनी वही, पेन, व खाऊ वाटप केले,तसेच कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक श्री.शंकर कोळेकर(मेजर) यांनी देखील आपले देशाबद्दल भाषण केले व कार्यक्रमाबद्दल चे विश्लेषण व आपले विचार व्यक्त पै.अशोक गोफने यांनी देखील मांडले.तसेच ध्वजारोहण हा श्री नितीन गोफने ,(अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला श्री प्राध्यापक पोपट पाटील (मुख्याध्यापक जि. प. प्रा शाळा खांबेवाडी) यांचे देखील मोलाचा वाटा होता. तसेच शाळेच्या शिक्षिका यांनी देखील खूप परिश्रम घेतला, तसेच ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ शिंदे व रुपेश जी लांडगे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.