इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड
काँग्रेस (INTUC) सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजीवजी रेड्डी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ कैलास (भाऊ) कदम व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी संघटनात्मक घोषणापत्र देऊन केली.
निवडीनंतर जाधव म्हणाले प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन संघटना वाढवील तसेच महाराष्ट्र इंटकचा नावलौकिक वाढवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन नागरिकांना काँग्रेस (INTUC) पक्षाचे लक्ष व धोरणे समजावून काँग्रेस (INTUC) चे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन मन धनाने करेन.
निवडीनंतर काँग्रेस (INTUC) जिल्हा व राज्याचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.