शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन युवा नेते पै. शिवाजी तात्या नरूटे यांचा पाटील गटात प्रवेश
करमाळा तालुक्याचे युवा नेते पैलवान शिवाजी तात्या नरुटे यांनी श्री नारायण आबा पाटील यांच्या गटामध्ये शेकडो कार्यकर्तेंसह आज शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आलेल्या संसद रत्न खासदार सौसुप्रियाताई सुळे, महाराष्ट्राचे युवा नेते संसद रत्न खासदार डॉअमोल कोल्हे साहेब, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, करमाळा माढा मतदारसंघाचे भावी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
पैलवान शिवाजी नरुटे यांचा करमाळा तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. शिवाजी नरुटे यांच्या प्रवेशामुळे पूर्व भागामध्ये श्री नारायण आबा पाटील यांच्या गटाची ताकद वाढली आहे, गावागावांमध्ये त्यांचे युवक कार्यकर्ते आहेत. येणाऱ्या विधानसभेला नारायण आबा पाटील यांचा विजय हा सुखकार होणार आहे.
सत्काराला उत्तर देताना पैलवान शिवाजी नरुटे म्हणाले की जीवात जीव असे पर्यंत नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार असे मनोगत व्यक्त केले.